मच्छिमार व किनाऱ्यावरील गावांना सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:40+5:302021-05-12T04:32:40+5:30

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याच्या सूचनेनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यावर ४० ...

Warning to fishermen and coastal villages | मच्छिमार व किनाऱ्यावरील गावांना सावधानतेचा इशारा

मच्छिमार व किनाऱ्यावरील गावांना सावधानतेचा इशारा

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याच्या सूचनेनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यावर ४० ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सर्व मच्छिमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

१४ ते १६ मे या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तमिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्‍यात आलेली आहे, तसेच १६ मे रोजी महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यावर ४० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सर्व मच्छिमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून, १५ व १६ मे या कालावधीत संबंधितांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता भडकवाड यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Warning to fishermen and coastal villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.