गुदाम फोडून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:50+5:302021-05-13T04:31:50+5:30

रत्नागिरी : शहरानजीकच्या झाडगाव एमआयडीसी येथील मनस्वी एंटरप्रायझेस कंपनीचे गुदाम फोडून सुमारे ५३ हजार रुपयांच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या. ...

Warehouse burglary | गुदाम फोडून चोरी

गुदाम फोडून चोरी

रत्नागिरी : शहरानजीकच्या झाडगाव एमआयडीसी येथील मनस्वी एंटरप्रायझेस कंपनीचे गुदाम फोडून सुमारे ५३ हजार रुपयांच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी ४ जणांविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, १० मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

भिकाजी प्रक्षाले आणि अन्य तीन जण (सर्व, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कौशिक निर्मल सेन (५०, मूळ रा. पंढरपूर सध्या रा. रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. प्रक्षाले व अन्य तीन जणांनी संगनमताने कंपनीच्या गुदामाचे कुलूप तोडून त्यातील एलईडी लॅम्प, घमेली, लोखंडी पार, टिकाव, फावडी व इतर साहित्य आपल्या पिकअप गाडीतून (क्र. एमएच १३ सीयू ११७०) चोरून नेले, असे कौशिक सेन यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Web Title: Warehouse burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.