शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

वडाप तेजीत; एसटीची मंदीघंटा अद्याप कायम

By admin | Published: April 25, 2017 10:55 PM

परिवहन महामंडळ : १९ कोटी २३ लाखांचे यंदा कमी उत्पन्न

रत्नागिरी : बंद झालेल्या लांबपल्ल्याच्या गाड्या, बेसुमार अवैध वाहतूक व्यवसाय यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. सहन करावा लागत आहे. गतवर्षी हाच तोटा २ कोटी १७ लाख इतका होता. आता तो तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांवर गेला आहे.ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पोहोचलेल्या एस. टी.ला ‘जीवनवाहिनी’ असे संबोधले जाते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीशी एस. टी.ला सातत्याने स्पर्धा करावी लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महामंडळाने शटल फेऱ्यांची सुविधा सुरू केली आहे. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जाऊन एस. टी. पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एस. टी. धावत असल्यामुळे एस. टी.चे नुकसान होत आहे. इंधनदरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळाला भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यावर्षी महामंडळाने दिवाळीच्या सुटीत काही दिवसांपुरती हंगामी भाडेवाढ केली होती. रत्नागिरी विभागातर्फे ‘मागेल त्याला गाडी’ अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. याशिवाय ‘प्रवासी वाढवा’ अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी गाडीत घेऊन वाहतूक करण्यात आली. तसेच निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसमारंभ यामुळे एस. टी.ला उत्पन्न प्राप्त होत आहे.अवैध प्रवासी वाहतूक वाढत असतानाच महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागत आहे. शिवाय आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने शटल फेऱ्या सुरु केल्या आहेत. मात्र अजूनही सर्वच भागांमध्ये अवैध वाहतुकीचे प्रमाण खूप मोठे असून, त्यामुळेच एस. टी. महामंडळ सातत्याने तोट्यात जात आहे.सन २०१६ - १७मध्ये रत्नागिरी विभागाला २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दापोली आगाराला ३१ कोटी ३९ लाख ६० हजार, खेड आगारास ३१ कोटी ४६ लाख ६० हजार, चिपळूण आगारास ४४ कोटी २७ लाख ३२ हजार, गुहागर आगारास २६ कोटी २ लाख २४ हजार, देवरुख आगारास २७ कोटी ७३ लाख ४५ हजार, रत्नागिरी आगारास ५३ कोटी ७० लाख ८५ हजार, लांजा आगारास १६ कोटी ४० लाख ४७ हजार, राजापूर आगारास १७ कोटी ४१ हजार ८, मंडणगड आगारास १२ कोटी ८१ लाख ५५ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.गतवर्षी दापोली आगाराला ३४ कोटी ५० लाख ३६ हजार, खेड आगाराला ३३ कोटी ३१ लाख ७४ हजार, चिपळूण आगाराला ४६ लाख ५७ लाख ३५ हजार, गुहागर आगाराला २८ कोटी २७ लाख ५३ हजार, देवरूख आगाराला २९ लाख ५५ हजार, रत्नागिरी आगाराला ५६ कोटी ९२ लाख २६ हजार, लांजा आगाराला १८ कोटी ३५ लाख ८३ हजार, राजापूर आगाराला १९ कोटी ९२ लाख ६८ हजार, मंडणगड आगाराला १३ कोटी ९५ लाख ८० हजाराचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)बारटक्के : लांब पल्ल्याच्या गाड्या बंदरत्नागिरी विभागाला २०१६-१७मध्ये २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त.४गतवर्षी २८० कोटी १२ हजारांचे उत्पन्न.गतवर्षी विभागाच्या उत्पन्नात २ कोटी १७ लाखांची घट.यावर्षी तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांची घट सोसावी लागतेय.महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागतोय.