५० ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

By Admin | Updated: November 21, 2015 23:58 IST2015-11-21T23:10:42+5:302015-11-21T23:58:48+5:30

राज्य निवडणूक आयुक्त सहारीया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला

Voting on December 19 for 50 gram panchayats | ५० ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

५० ग्रामपंचायतींसाठी १९ डिसेंबरला मतदान

रत्नागिरी : राज्यातील विविध २७ जिल्ह्यातील १७३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. १९ रोजी मतदान झाल्यानंतर दि. २१ रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी ते एप्रिल २०१६ अखेर संपत आहे. ग्रामपंचायती क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. ठाणे ३, रायगड ५, रत्नागिरी ५०, सिंधुदुर्ग २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक नोेटीस दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारण्याची तारीख ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर असणार आहे. नामनिर्देशनाची छाननी ५ रोजी तर मागे घेणे व निवडणूक चिन्हांचे वाटप ८ रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
राजापूर तालुका- मोगरे, वडदहसोळ, राजवाडी, आंगले, देवाचे गोठणे, भालावली, केळवली, मूर, सागवे. मंडणगड तालुका- घराडी, निगडी. दापोली तालुका- इनामपांगरी, नवसे, गावतळे, फणसू. खेड तालुका- सुसेरी, नांदगाव, तळघर, वडगाव बु., देवघर, आस्तान, असगणी. चिपळूण तालुका- पोफळी. गुहागर तालुका- अंजनवेल, वेलदूर, वेळंब, चिंद्रवळे. संगमेश्वर तालुका- असुर्डे, कोंड असुर्डे, आंबेडबुद्रुक. रत्नागिरी तालुका- फणसोप, शिरगाव, पोमेंडीबुद्रुक. लांजा- वेरवली बुद्रुक, कोचरी, कोर्ले, गोविळ, ताम्हाणे, कोल्हे, रिंगणे, शिरवली, व्हेळ, हर्चे, देवधे, कोंड्ये, झापडे, प्रभानवल्ली, उपळे.

Web Title: Voting on December 19 for 50 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.