ाावर्डेत इच्छुकांची मतबांधणी सुरु
By Admin | Updated: October 18, 2016 23:53 IST2016-10-18T23:53:54+5:302016-10-18T23:53:54+5:30
गटातटाचा फटका? : उमेदवार घोषित करण्याआधीच तयारी सुरुवात; तिकीट कोणाला?

ाावर्डेत इच्छुकांची मतबांधणी सुरु
सावर्डे : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जवळ आल्याने जिल्ह्यात सध्या सर्व पक्षीय इच्छूक उमेदवारांनी मतदारसंघानुसार आपली मतबांधणी जोरात सुरू केली आहे. त्यात काही आजी - माजी सदस्य व पदभार असणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सेनेचा जोर असला तरी तुलनेत राष्ट्रवादीही पक्ष कुठे कमी नाही. राष्ट्रवादी पक्षाचा चिपळूणचा जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांचा विचार करून शरद पवार यांनी निवडणुकीची सर्व सूत्र चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे दिली असल्याने या निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.
सावर्डेमधून राष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य विजय गुजर, युगंधरा राजेशिर्के, प्रशांत निकम यांच्या नावांची चर्चा आहे. विजय गुजर हे भास्कर जाधवांचे कट्टर समर्थक आहेत. भास्कर जाधव सेनेत असताना सेनेकडून त्यांनी चिपळूण पंचायत समिती, सावर्डे ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यावेळेला सावर्डे ग्रामपंचायतीवर विजय गुजर यांनी आपल्या कर्तृत्वशैलीवर सेनेची सत्ता आणून भगवा फडकवला होता. एकेकाळी सावर्डे गणातून विजय गुजर आणि शेखर निकम आमने - सामने निवडणूक लढले होते. त्यावेळी शेखर निकम यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कालांतराने भास्कर जाधव यांनी आपल्या हातातील भगवा झेंडा खाली ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे कट्टर समर्थक त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष बळकट झाला. गोविंंदराव निकम यांनी विजय गुजर यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानून त्यांना पक्षातर्फे जिल्हा परिषदेतून उमेदवारी दिली होती, तिथे ते निवडूनही आले. राष्ट्रवादी पक्षाचा ते विश्वासू कार्यकर्ता ठरले. विजय गुजर पुन्हा जिल्हा परिषदेस इच्छुक आहेत. आरक्षण पडण्यापूर्वीच पक्षाने त्यांना जिल्हा परिषद उमेदवारीचा हिरवा कंदील दिला होता. परंतु आरक्षण सर्वसाधारण पडल्याने अनेक इच्छुकांच्या आशा उंचावल्या आहेत.
युगंधरा राजेशिर्के या निकम घराण्यातील एक कर्तव्यशील समाजकार्यकर्त्या आहेत. १९९२च्या निवडणुकीत त्यांना सावर्डेतून उमेदवारी मिळाली नाही म्हणून कामथे येथून उभ्या राहिल्या आणि त्या निवडून आल्या. रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय माजी खासदार गोविंदराव निकम यांच्या खासदारकीच्या निवडणूक प्रचारात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी त्यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीची इच्छा व्यक्त केली असून, त्यांचे जुने समर्थक त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांचे बंधू प्रशांत निकम यांच्या नावाचीही चर्चा आहे. हीच परिस्थिती पंचायत समिती निवडणूक उमेदवारीसाठी आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम यांचे नाव चर्चेत आहे, तर काही ठिकाणी रमेश कदम कट्टरसमर्थक सावर्डे विभातील भारत कोकाटे, भास्कर जाधव सेनेत असताना त्याच्या विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे रमेश कदम यांच्यात काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाले. त्यावेळी कोसंबीत दोन्ही पक्षांदरम्यान तणाव निर्माण झाला होता, यातील त्या वेळेचे कट्टर रमेश कदम समर्थक भारत कोकाटे हे होते. आता त्यांच्या पत्नी भारती कोकाटे याचेही नाव चर्चेत आहे. त्या दोन वेळा सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या होत्या. रमेश कदम आपल्या कट्टर समर्थकांना उमेदवारीचे तिकीट देणार का? याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
बावा राजेशिर्के, सावर्डे उपविभागप्रमुख व माजी शाखाप्रमुख प्रदीप चव्हाण हेही या रिंगणात आहेत. युवराज राजेशिर्के हे यापूर्वी चिपळूण पंचायत समितीतून मागील निवडणुकीतून विजयी होऊन सभापती झाले होते. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. बाळशेठ जाधव हे भास्कर जाधवांचे बंधू असून, कट्टर विरोधक आहेत. सेनेतून राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीतून पुन्हा सेनेत प्रवेश केला. आता ते कट्टर भास्करविरोधक असल्याने त्यांना सावर्डे गणातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीला एक वेगळा रंग येण्याची शक्यता आहे.