आवाज कुणाचा... शिवसेनेचा!

By Admin | Updated: April 24, 2015 01:27 IST2015-04-24T01:24:24+5:302015-04-24T01:27:19+5:30

रत्नागिरी तालुका : मनसेने उघडले खाते, भाजपचे दिसले स्वबळ

Voice of the voice ... Shivsena! | आवाज कुणाचा... शिवसेनेचा!

आवाज कुणाचा... शिवसेनेचा!

रत्नागिरी : तालुक्यातील ३३१ ग्रामपंचायतींसाठी आज झालेल्या मतमोजणीवरही शिवसेनेचेच वर्चस्व दिसून आले. भाजपने स्वबळ आजमावताना दहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे मनसेनेही दोन जागांवर विजय मिळवीत या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले खाते खोलले.
रत्नागिरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शहरानजीकच्या पॉवर हाऊस यथील सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० वाजता कडकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला प्रारभ झाला. सुरूवातीपासूनच तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले.
तालुक्यातील मजगाव, सोमेश्वर, बसणी, नेवरे, सडामिऱ्या, कळझोंडी, आगरनरळ, नांदिवडे, नाचणे या ठिकाणी केवळ शिवसेनाच असे चित्र दिसले. इतर ठिकाणीही शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून आले. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे. भाजप तसेच अन्य पक्षांना अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीने रत्नागिरी तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर फक्त शिवसेनाच असा ठसा उमटविला आहे. साऱ्यांनाच उत्सुकता असलेल्या या निवडणुकीच्या या निकालाने रत्नागिरी तालुक्यावर अजूनही शिवसेनेचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Voice of the voice ... Shivsena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.