कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मयीन पुरस्कार

By Admin | Updated: November 13, 2015 23:45 IST2015-11-13T21:35:42+5:302015-11-13T23:45:02+5:30

कोमसापचे संमेलन : मुंबई येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात २२ रोजी वितरण सोहळा

Vocational Award by Konkan Marathi Sahitya Parishad | कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मयीन पुरस्कार

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मयीन पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्यीन पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या वाङ्मयीन १५ पुरस्कारांची घोषणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
कोमसाप पुरस्कारांचे वितरण दादर (मुंबई) येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात २२ रोजी होणाऱ्या संमेलनात होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे.
कादंबरीसाठी देण्यात येणारा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार अशोक समेळ यांना ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ कादंबरीसाठी जाहीर झाला आहे. तसेच वि. वा. हडप स्मृती विशेष कादंबरी पुरस्कार प्रा. चंद्रकांत मढवी ‘उधळ्या’ यांना देण्यात येणार आहे. कथासंग्रहासाठी वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टीफन परेरा ‘पोपटी स्वप्न’ यांना, तर विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनीष पाटील यांना ‘माह्यावाल्या गोष्टी’ कथासंग्रहासाठी देण्यात येणार आहे.
कवितेकरिता आरती प्रभू स्मृती पुरस्कार शशिकांत तिरोडकर यांना ‘शशिबिंंब’, तर वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार रेखा कोरे ‘वास्तवाच्या उंबरठ्यावर’ कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. चरित्र आत्मचरित्र प्रकारात धनंजय कीर स्मृती पुरस्कार मोहन गोरे यांना ‘आनंदयात्रा’ तसेच श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार डॉ. भगवान कुलकर्णी- ‘आॅनरेबली अ‍ॅक्वीटेट’ यांना देण्यात येणार आहे. ललित गद्यातील अनंत काणेकर स्मृती पुरस्कार नीला सत्यनारायण यांना ‘टाकीचे घाव’, तर लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार रेखा नार्वेकर यांना ‘आनंदतरंग’साठी देण्यात येणार आहे. बालवाङ्मय प्रकारातील प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार डॉ. विद्याधर करंदीकर यांना ‘नाथ पै असाही एक लोकनेता’साठी देण्यात येणार आहे. संकीर्ण वाङ्मय प्रकारात वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार गोपीनाथ सावंत ‘झाकोळलेले प्राचीन कोकण’ यांना तसेच अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार विद्या जोशी यांना ‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’साठी दिला जाणार आहे. दृकश्राव्य कला, सिनेमा प्रकारातील भाई भगत स्मृती पुरस्कार दिवाकर गंधे यांना ‘चित्रगंध’साठी, तर नाटक एकांकिका प्रकारासाठी रमेश कीर पुरस्कार- विनोद पितळे ‘बाय द वे’करिता दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)

पुरस्कार समितीचे निमंत्रक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण नेरूरकर यांनी सर्व पुरस्कारांची घोषणा केली. दरवर्षी कोमसापतर्फे समीक्षा ग्रंथासाठी प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार देण्यात येतो. मात्र, यावर्षी स्पर्धेत योग्य पुस्तक आले नसल्यामुळे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नसल्याचे कोमसापतर्फे सांगण्यात आले आहे.

Web Title: Vocational Award by Konkan Marathi Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.