जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST2021-05-16T04:31:12+5:302021-05-16T04:31:12+5:30

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत जिल्हा रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संच ...

Visit of Oxygen Concentrator to District Hospital | जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट

जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत जिल्हा रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संच देणगी स्वरूपात देण्यात आले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ़. संघमित्रा फुले - गावडे यांच्याकडे हे काॅन्सन्ट्रेटर देण्यात आले़.

सध्या देशभरात ऑक्सिजन वायूची कमतरता आणि कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी देऊन रुग्णालयाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले हाेते. याचाच एक भाग म्हणून १४ मे रोजी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले - गावडे यांनी कोविड १९ या परिस्थितीत निरंतर पाठिंबा दिल्याबद्दल मुकुल माधव फाऊंडेशनच्या विश्वस्थ रितू प्रकाश छाब्रिया यांचे आभार मानले.

Web Title: Visit of Oxygen Concentrator to District Hospital