विश्वास मोरे राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:46+5:302021-07-18T04:22:46+5:30

खेड: तालुक्यातील आंबये गावचे सुपुत्र विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी मुंबईत झालेल्या बैठकीत निवड ...

Vishwas More as the Chairman of the Punch Board of the State Kabaddi Association | विश्वास मोरे राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी

विश्वास मोरे राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी

खेड: तालुक्यातील आंबये गावचे सुपुत्र विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी मुंबईत झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा खासदार गजानन किर्तीकर यांच्या आदेशाने मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्ष पदावर नुकतीच निवड झाली आहे. विश्वास मोरे यांनी यापूर्वी अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या पंच समितीचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच तीस राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबई कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही ते काम करत आहेत. विश्वास मोरे यांची निवड झाल्याबद्दल कबड्डी खेळाडू व संघटना पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Vishwas More as the Chairman of the Punch Board of the State Kabaddi Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.