आचारसंहितेचा भंग; चिपळुणात दोघांना अटक
By Admin | Updated: June 10, 2014 01:26 IST2014-06-10T01:25:42+5:302014-06-10T01:26:08+5:30
खेर्डी येथे लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ बैठक घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आज (सोमवारी) चिपळूण पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.

आचारसंहितेचा भंग; चिपळुणात दोघांना अटक
चिपळूण : खेर्डी येथे लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ बैठक घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आज (सोमवारी) चिपळूण पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.
लोकसभा निवडणुकीत यंदा आचारसंहिता भंगाचे प्रकार कमी प्रमाणात घडले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच प्रशासनाने या निवडणुकीवर बारकाईने आणि कडक नजर ठेवली होती. त्यामुळे यंदा आचारसंहिता भंगाच्या प्रकारांमध्ये घट झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत खेर्डी शिवाजीनगर येथे सुनील मेस्त्री यांच्याघरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर बाजारात रॅली काढण्यात आली होती. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला, अशी तक्रार दाखल झाल्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली होती.
आज सुनील मेस्त्री व त्यांच्या पत्नी स्नेहा मेस्त्री यांना अटक करण्यात आली. याप्रकरणात १२ आरोपी असून, आतापर्यंत १० जणांना अटक झाली आहे.
उर्वरित आरोपींची नावे चुकीची असल्याने त्या नावाची व्यक्ती आढळत नसल्याने अद्याप त्यांना अटक झालेली नाही. दरम्यान, अधिक तपास चिपळूणचे पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)