शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:43 IST

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.

असगाेली : गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी नेताना नदीतील ढोपरभर पाण्यातून प्रवास करून न्यावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या नदीवर पूल बांधण्याची मागणी करूनही आजवर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माणसाच्या मरणानंतरही त्याचा प्रवास खडतरच असल्याचे दिसत आहे.एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी-सुविधांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता मरणानंतरही  हाल भोगावे लागत आहेत, मृत्यूनंतर तरी शासन आम्हाला सुखाने मरण देईल का, असा प्रश्न केला जात आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली-तेलीवाडी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशानभूमीकडे जावे लागत आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे. विजेची समस्या, अडचणीच्या पायवाटा तसेच भर पावसात नदी-ओढ्यातून कंबरभर पाण्यातून चाललेली प्रेतयात्रा तसेच दगड-धोंड्यातून चाललेला प्रवास ही अवस्था वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांची आहे.वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना दगड-गोटे तुडवीत, नादुरुस्त रस्त्यावरून, जंगल भागातून अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीलगत असणाऱ्या नदीवर पूल बांधून मिळावा, अशी मागणी केली जात आहे.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटा तसेच रस्ते त्याची शासन दप्तरी नोंद नाही. याठिकाणी असणाऱ्या नदीवर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शासकीय नियमांचे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रेत नेताना नदी ओढ्यातून जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या या व्यथेकडे लाेकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी