शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अपहरणाच्या संशयाने तरुणाला ग्रामस्थांचा चोप, तरुण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:14 IST

रत्नागिरी : तरुणीची समजूत काढण्यासाठी तिला भेटण्यासाठी नातेवाइकांसह आलेला तरुण तिचे अपहरण करत असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. ...

रत्नागिरी : तरुणीची समजूत काढण्यासाठी तिला भेटण्यासाठी नातेवाइकांसह आलेला तरुण तिचे अपहरण करत असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने गाडीसह तिथून पलायन केले. अखेर या तरुणाला नाणीज येथे ग्रामस्थांनी पकडले आणि त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी नाणीज (ता. रत्नागिरी) येथे घडला.घाटमाथ्यावरील एका तरुणाचे एका तरुणीशी दाेन वर्षांपूर्वी प्रेम जुळले हाेते. मात्र, काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला हाेता. या वादातून त्या तरुणाविरोधात राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे, तर तरुणीला एका स्वयंसेवी संस्थेत आश्रयाला ठेवण्यात आले आहे. या तरुणीची समजूत काढण्यासाठी हा तरुण त्याची बहीण, भाचा आणि अन्य काही मंडळींसह चारचाकी गाडी घेऊन निवळी येथे आला हाेता. तिला केस मागे घेण्याचा आग्रह त्यांनी सुरू केला. त्यावरून बाचाबाची झाली आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांना वेगळीच शंका आली. त्यामुळे त्यांनी त्या तरुणाला हटकण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्या तरुणाने चारचाकी गाडीत आपल्यासाेबत आलेल्या सर्वांना बसवून तेथून पळ काढला. गाडीत महिला बसलेल्या पाहिल्याने ग्रामस्थांना हा अपहरणाचा प्रयत्न असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कारवाईच्या भीतीने हा तरुण सुसाट वेगाने महामार्गावरून निघाला. हातखंबा येथील पाेलिसांना चकवा देऊन ताे थेट पालीत पोहोचला. त्यानंतर अंतर्गत मार्गाने ताे नाणीज गावात वळला. याठिकाणी ग्रामस्थांनी त्याला अडविले आणि त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू हाेते. त्यामुळे त्या तरुणाचे नाव कळू शकलेले नाही.

रस्त्याच्या कामामुळे फसलापाेलिसांच्या कारवाईच्या भीतीने सुसाट निघालेला तरुण नाणीजला अंतर्गत मार्गाने निघाला हाेता. नाणीज येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने त्याला वेगाने गाडी पळवता आली नाही. रस्त्याच्या मातीच्या ढिगाऱ्यात त्याची गाडी फसली आणि ताे ग्रामस्थांच्या तावडीत सापडला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस