शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात गावठी दारू निर्मिती केंद्र उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:07 IST

liquor ban Excise Department राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू विरोधातील मोहीम अधित तीव्र केली असून, कौंढर काळसूर (ता. गुहागर) येथील गावठी दारू निर्मिती केंद्रावर मंगळवारी धाड टाकून केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५,७६,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्ह्यातील ही आतपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्काची कारवाई पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू विरोधातील मोहीम अधित तीव्र केली असून, कौंढर काळसूर (ता. गुहागर) येथील गावठी दारू निर्मिती केंद्रावर मंगळवारी धाड टाकून केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५,७६,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्ह्यातील ही आतपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अनेक हातभट्ट्यांवर छापे मारून गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कौंढर काळसूर येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.या माहितीनुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक, चिपळूण, खेउ, लांजा, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली.

यावेळी गावठी दारू व रसायन असा एकूण ५,७६,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास २३००० लीटर रसायन आढळले. या कारवाई दरम्याने कोणतीही व्यक्ती आढळलेली नाही. त्यामुळे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागRatnagiriरत्नागिरी