विद्याधर कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:45+5:302021-09-10T04:38:45+5:30
हातखंबा : हातखंबा गावचे सुपुत्र, नंदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सध्या जिल्हा परिषद प्राथमिक ...

विद्याधर कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
हातखंबा : हातखंबा गावचे सुपुत्र, नंदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाजूळ येथे कार्यरत असलेले विद्याधर लक्ष्मण कांबळे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
विद्याधर कांबळे यांची एकूण २६ वर्षे सेवा झालेली आहे. १७ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे कार्य करीत ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या सहकार्याने शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केलेले आहे. शिक्षक म्हणून कार्य करत असताना विविध शैक्षणिक स्पर्धा, विविध साहित्य संग्रह निर्मिती, सांस्कृतिक विकास, विज्ञान जत्रा यावर त्यांनी भर दिलेला आहे. ग्रामस्थ, शिक्षक यांच्या सहकार्यातून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात ते अग्रेसर राहिलेले आहेत. बालआनंद मेळावा, महिला आनंद मेळावा आणि वृक्षारोपण यासारखे राष्ट्रीय कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल करबुडे-लाजूळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.