उपनगराध्यक्षांनी चाेरली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:32 IST2021-05-09T04:32:19+5:302021-05-09T04:32:19+5:30

खेड : खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुनील बाबूराव दरेकर यांच्या विरोधात त्यांच्याच सख्ख्या भावाची इनोव्हा क्रिस्टा मोटार चोरल्याप्रकरणी दि. ७ ...

The vice president drove the car | उपनगराध्यक्षांनी चाेरली कार

उपनगराध्यक्षांनी चाेरली कार

खेड : खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुनील बाबूराव दरेकर यांच्या विरोधात त्यांच्याच सख्ख्या भावाची इनोव्हा क्रिस्टा मोटार चोरल्याप्रकरणी दि. ७ रोजी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्वरूपनगर एस. टी. डेपोसमोर ही घटना घडली आहे. याबाबत सतीश बाबूराव दरेकर यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यांचा भाऊ सुनील बाबूराव दरेकर हे संमतीशिवाय घरात घुसून घरातील इनोव्हा क्रिस्टा कार किंमत सुमारे ६० हजार रुपये, कागदपत्रे, तसेच घरासमोर लावण्यात आलेली इनोव्हा मोटार (एमएच ०८, एइन १७१६) क्रमांकाची क्रिस्टा मोटार संमतीशिवाय चोरून नेली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांचा भाऊ आणि खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्यावर खेड पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर करीत आहेत.

Web Title: The vice president drove the car