शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:21 IST

हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ लेखिका स्मिता शरद राजवाडे यांचे मंगळवारी रात्री मंगळुरू येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७३ वर्षांच्या होत्या.

स्मिता राजवाडे यांचा जन्म ३० जानेवारी १९४८ रोजी झाला. त्यांचे पती शरद यांचे २००५ साली निधन झाले. स्मिता राजवाडे यांनी हिंदी आणि मराठी या दोन विषयांत प्रथम श्रेणीतून एम. ए. पदवी संपादन केली. राष्ट्रभाषा पंडित, साहित्य विशारद या परीक्षाही त्या ‘प्रथम’ श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता.स्वा. सावरकर, कुसुमाग्रज, संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. रामचरितमानस या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्या उर्दू भाषाही शिकल्या. त्यातून त्यांनी उर्दू साहित्याचा अभ्यास केला.

त्यांनी काही उर्दू काव्यरचनाही केल्या होत्या. कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कोकण मराठी कोषामध्ये त्यांनी लेखन केले आहे. स्त्रीजीवन, संतसाहित्यावरील लेखनाचा त्यात समावेश आहे. गुण गुण गाणी या त्यांच्या बालसाहित्य संग्रहाला पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला. शीघ्रकाव्य हेही त्यांच्या साहित्यप्रतिभेचे वैशिष्ट्य होते.

रत्नागिरीत आकाशवाणीचे केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रम केंद्रावर सादर केले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री होत्या. त्यांना ‘ए‘ ग्रेड कलाकार म्हणून मान्यता मिळाली होती. श्रीमती राजवाडे यांनी रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूल आणि फाटक प्रशालेत काही काळ अध्यापन केले. रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील जनसेवा ग्रंथालयासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले.

त्यांना स्वाती, साक्षी आणि गौरी अशा तीन विवाहित कन्या आहेत. गेली दोन वर्षे त्या मंगळुरू येथील कन्या साक्षी अभिजित शिवलकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथेच त्यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी