सेवानिवृत्तांनी केला वयोवृद्धांचा सत्कार
By Admin | Updated: January 28, 2015 00:52 IST2015-01-27T21:55:59+5:302015-01-28T00:52:02+5:30
प्रत्यक्ष घरी जाऊन या केलेल्या सत्कारामुळे कुटुंबियही भारावून गेले. त्यांनी या स्तुत्य उपक्रमांबद्दल कृ तज्ञता व्यक्त केली.

सेवानिवृत्तांनी केला वयोवृद्धांचा सत्कार
रत्नागिरी : पूर्वी आयोजित केलेल्या अमृत महोत्सव सत्कार समारंभाला जे वयोवृद्ध सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांसोबत जिल्हा परिषद सेवा निवृत्त सेवा समितीतर्फे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्यक्ष घरी जाऊन या केलेल्या सत्कारामुळे कुटुंबियही भारावून गेले. त्यांनी या स्तुत्य उपक्रमांबद्दल कृ तज्ञता व्यक्त केली.सत्कारमूर्तींमध्ये कोतवडे येथील पांडुरंग ठोंबरे, हरचिरीचे शंकर कदम, निवखोलचे दिगंबर घवाळी, नाचणे येथील शंकर पटवर्धन यांचा समावेश होता. या उपक्रमामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्बास मुल्ला, तालुकाध्यक्ष गजानन भरणकर, उपाध्यक्ष मनोहर आयरे, जिल्हासचिव अशोक बसणकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत थेराडे, आत्माराम गोणबरे, कोतवडे येथील पाखरे, सुदेश चव्हाण व सत्कारमूर्तींचे कुटुुंबीय उपस्थित होते. या सत्काराने त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करून हे क्षण आमच्यासाठी लक्षणीय असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)