अडखळ येथे १० हजारांच्या खैरासह गाडी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:09+5:302021-09-02T05:07:09+5:30
मंडणगड : खैर झाडाच्या तुकड्यांची चाेरी करून विनापरवाना त्यांची वाहतूक करणाऱ्या दाेघांवर मंडणगड पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला ...

अडखळ येथे १० हजारांच्या खैरासह गाडी ताब्यात
मंडणगड : खैर झाडाच्या तुकड्यांची चाेरी करून विनापरवाना त्यांची वाहतूक करणाऱ्या दाेघांवर मंडणगड पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३० ऑगस्ट २०२१ राेजी सायंकाळी ४ वाजता अडखळ येथे करण्यात आली. या कारवाईत दहा हजार रुपये किमतीचा सोललेला खैर व ९५ हजार रुपये किमतीचा पोयाजीवो कंपनीचा टेम्पो असा १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यासंदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र तांदळे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३० ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता मौजे अडखळ येथे प्रमोद सुर्वे (३८, रा. विसापूर, मोरेवाडी ता. दापोली), नजीर कडवेकर (३०, रा. विसापूर पाथरी ता. दापोली) ॲपे टेम्पाे (एमएच ०८, डब्ल्यू ५३७२) या गाडीतून स्वतःचे फायद्याकरिता दहा हजार रुपये किमतीचे खैराचे साली काढलेले लहान मोठे ओंडके घेऊन जात हाेते. हे ओंडके चोरी करून विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे तपासात पुढे आले हाेते.
तसेच गाडी चालविण्याचा परवानाही त्यांच्याकडे नव्हता. या दोघांविरोधात भारतीय दंडविधान कलम ३७९,३४ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (अ) (फ), ४१(२)(ख) ४२ सह महावन नियमावली कलम ४१ मोटार वाहन कायदा कलम ३-१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाणे करत आहेत.