शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात भाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:56+5:302021-09-05T04:35:56+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे वाढत्या महागाईने त्रस्त जनतेस दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी ते थेट ग्राहक स्वस्त ...

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात भाजी
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे वाढत्या महागाईने त्रस्त जनतेस दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी ते थेट ग्राहक स्वस्त दरात भाजी विक्री’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी (३ सप्टेंबर रोजी) प्रभाग क्र. ७ निवखोल परिसरात करण्यात आला. नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष मयूरेश मडके यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, शहरअध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष अजिंक्य केसरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र. ७ मधील विभाग अध्यक्ष अशोक बारगोडे, उपविभाग अध्यक्ष परेश शेट्ये, शाखाध्यक्ष राहुल खेडेकर, उपशाखाध्यक्ष मारुती लोहार, गट अध्यक्ष ब्रिजेश गमरे, गौरव चव्हाण, सौरभ मुळ्ये, ऋतिक रहाटे यांनी विशेष मेहनत घेतली. रोहन पुसाळकर व मनोज सारंग यांचेही सहकार्य लाभले.
या उपक्रमात टेम्पोच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांना स्वस्त दरात भाजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवखोलबरोबरच सध्या सन्मित्रनगर येथे हा उपक्रम सुरू झाला असून अन्य भागातही ही सुविधा नागरिकांना उपलब्ध क़रून देऊन त्यांना स्वस्त भावात भाजी मिळण्यास मदत होणार असल्याचे मयूरेश मडके यांनी सांगितले. या उपक्रमाचा सर्व शहरवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, शहर अध्यक्ष सतीश राणे व उपशहर अध्यक्ष मयूरेश मडके यांनी केले आहे.