वेद पुरोहित, स्नेहा मुसळे स्पर्धांमध्ये प्रथम
By Admin | Updated: January 6, 2015 21:52 IST2015-01-06T21:48:15+5:302015-01-06T21:52:24+5:30
जिल्हास्तरीय स्पर्धा : समूहगान स्पर्धेत खेर्डी शाळेला विजेतेपद

वेद पुरोहित, स्नेहा मुसळे स्पर्धांमध्ये प्रथम
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, सावर्डेतर्फे स्व. गोविंदराव निकम जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत देवरुखचा वेद पुरोहित, निबंध स्पर्धेत राजापूरची स्नेहा मुसळे व देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक शाळा, खेर्डीने विजेतेपद पटकावले.
सावर्डेच्या सरपंच सानिका चव्हाण व सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक शांताराम खानविलकर यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन झाले. संचालक मारुती घाग, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दीपक शिरोडकर, समीक्षा हरवंदे, पूजा निकम, मुख्याध्यापिका प्रिया नलावडे, प्राचार्य अन्वर मोडक, केंद्रप्रमुख दत्तात्रय बोंगावे उपस्थित होते.
वक्तृत्त्व स्पर्धा - वेद विवेक पुरोहित (जिल्हा परिषद आदर्श शाळा, देवरुख नं. ३) प्रथम, द्वितीय विभागून - ईशा शशांक टिकेकर (छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, देवरुख नं. ४), वेदिका प्रवीण लिंगायत (धोंडिरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी), तृतीय विभागून - ऋतुजा भरत लाड (जिल्हा परिषद शाळा, ढाकमोळी, ता. चिपळूण) व सानिका प्रशांत चव्हाण (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तनाळी), उत्तेजनार्थ - स्वरा महेश केळकर, रोजीना साबळे (दोघीही सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, सावर्डे), योगिनी मिलिंद सहस्त्रबुद्धे (जिल्हा परिषद शाळा, बुरंबाड नं. २), परीक्षकांचे विशेष पारितोषिक - समीक्षा शशिकांत खांबे (जिल्हा परिषद शाळा, पांगारीतर्फे वेळंब - खांबेवाडी, ता. गुहागर) आणि गंधार विलास घाणेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळणेश्वर नं. १, ता.गुहागर)
निबंध स्पर्धा : प्रथम स्नेहा मनोज मुसळे (विश्वनाथ विद्यालय, राजापूर), द्वितीय रुची राजेश घाग (कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी), तृतीय पूर्वा शंकर जाधव (कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी) तर उत्तेजनार्थ गौरी शिंदे (सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी), प्रणव मधुकर गडदे (सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, सावर्डे), तनिष्का सर्जेराव पाटील (जिल्हा परिषद शाळा, विलवडे).
तसेच देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा प्रथम, चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी द्वितीय, सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, सावर्डे तृतीय, जिल्हा परिषद शाळा, पडवे-गवाणवाडी, ता. मंडणगड व जिल्हा परिषद आदर्श शाळा, देवरुख नं. ३ यांना उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भा. अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय, सावर्डेच्या शिवाजीराव घाग सभागृहात होणार असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)