शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

वाशी मार्केटमध्ये हापूस दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:32 IST

अवीट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज २५० ते ३०० पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवाशी मार्केटमध्ये हापूस दाखलसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक

रत्नागिरी : अवीट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज २५० ते ३०० पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच, शिवाय दरही खालावलेले आहेत. १५०० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. सध्या दमट हवामान असल्यामुळे आंब्याचा देठ कुजण्याचा प्रकार वाढला असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दि. १५ मार्चनंतर तापमान वाढल्यास देठ कुजण्याचा प्रकार थांबेल.थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. डिसेंबरपासून मोहोरावर असलेला थ्रीप्स कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही नष्ट होत नाही. तुडतुड्याबरोबर कीड रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही कीडीचा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव तसाच राहात आहे. काही ठिकाणी मोहोर काळा पडला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. करपलेला मोहोर सुधारण्याचा अवधी निघून गेल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत.हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबबत युरोपीय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही कडक भूमिका घेतली आहे. फळांमध्ये रासायनिक अंश सोडणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशा प्रकारची फवारणी झालेला हापूस न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हवामानात आता बदल होऊ लागला असून, उष्णता वाढत आहे. त्यामुळे दि. १५ मार्चनंतर येणारा आंबा नक्कीच चांगला, मधुर चवीचा असणार आहे. शिवाय आवकही त्यावेळी वाढेल. होळीनंतर उत्तरप्रदेशातील भय्ये मुंबईत दाखल होतात. मुंबई उपनगरात विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आवक वाढली तरी दर बऱ्यापैकी स्थिर राहतात. शिवाय रेसीड्यू फ्री आंबा चाचणीसाठी योग्य असणार आहे. 

कृषी विभागाने जिल्हाभरात थ्रीप्समुळे करपलेल्या बागायतींचा पंचनामा करून फळपीक विमा कंपनीकडे याबाबतचा अहवाल देणे गरजेचे आहे. महागडी कीटकनाशके पाहून ज्या बागायतदारांनी आंबा वाचविला आहे, त्या बागायतदारांचे पैसे होण्यासाठी दर टिकून राहाणे महत्त्वाचे आहे. भौगोलिक निर्देशांक याचवर्षी प्राप्त झाले असून, या निकषावर हापूसचे दर स्थिर राहाणे आवश्यक आहे.- राजन कदम, बागायतदार, शीळ-मजगाव.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी