शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणनजीक फाटकात तांत्रिक बिघाड, ‘वंदे भारत’ थांबली; सुदैवाने दुसऱ्या वेळीही मोठा अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:17 IST

चिपळूण : चिपळूणनजीक कळंबस्ते फाटा येथे फाटक बंद न झाल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस खेर्डी रेल्वे पुलावर ...

चिपळूण : चिपळूणनजीक कळंबस्ते फाटा येथे फाटक बंद न झाल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस खेर्डी रेल्वे पुलावर थांबवावी लागली. अखेर पायलटिंग करत फाटकापर्यंत नेऊन मॅन्युअली पद्धतीने फाटक बंद करण्यात आले. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. सुदैवाने दुसऱ्या वेळीही मोठा अनर्थ टळला आहे. कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण रेल्वे स्थानकानजीक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. पंधरागावाकडे जाणाऱ्या लोकांसाठी येथे उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने तरतूद केली आहे. राज्य शासनानेही तरतूद करणे गरजेचे आहे. या ठिकाणी फाटक असल्याने रेल्वे आली की दहा ते वीस मिनिट फाटक बंद राहते. त्यामुळे पंधरागावकडे जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना थांबून राहावे लागते. आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे फाटक बंद न झाल्याने तारांबळ उडाली होती.

मंगळवार ४ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास याच कळंबस्ते फाटकानजीक तोच प्रकार पुन्हा घडला. वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरीहून मुंबईकडे जात असता खेर्डी पुलानजीक आली. अचानक या एक्स्प्रेसला ब्रेक लावण्यात आले. पुलावरच गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर अत्यंत हळूहळू कळंबस्ते रेल्वे फाटकापर्यंत नेण्यात आली. रेल्वे फाटक मॅन्युअरली बंद करण्यात आली आणि त्यानंतर गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस