शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: हातिवले टोलनाक्यानंतर पाली-खानूमधील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही फोडलं 

By मनोज मुळ्ये | Updated: August 18, 2023 11:35 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील हातिवले टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल तोडफोड केली. त्यानंतर काल रात्री पाली-खानू (ता. रत्नागिरी) येथील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही फोडलं आहे. हातिवले येथील तोडफोडप्रकरणी राजापूर पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. मनसेचे राजापूर तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपतालुका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, रत्नागिरीतील पाली खानू मधील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही मनसेनं फोडलं. एकूणच, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर रत्नागिरीत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.रत्नागिरी तालुक्यातील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. या अगोदर रायगडच्या माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. माणगावमधील चेतक सन्नी कंपनीचं कार्यालय फोडलंय. त्यामुळे आता टोलवरुन मुंबई-गोवा महामार्गात मनसेचं खळ्ळखट्याक सुरू झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtollplazaटोलनाकाMNSमनसे