ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:02+5:302021-05-27T04:33:02+5:30
चिपळूण : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या सभासदांना दुसरा डोस मिळालेला नाही, तसेच काही कारणास्तव ज्यांना अद्याप पहिला डोस ...

ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करावी
चिपळूण : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या सभासदांना दुसरा डोस मिळालेला नाही, तसेच काही कारणास्तव ज्यांना अद्याप पहिला डोस मिळालेला नाही, अशा सभासदांना लस प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी यांनी पत्राद्वारे तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांच्याकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, अनेक ज्येष्ठ नागरिक लस न मिळाल्याने चिंतेत जगत आहेत. ऑनलाइन नोंदणी करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांना लस वेळीच मिळण्यात अडचणीचे ठरत आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना एक दिवस निश्चित करून लस दिल्यास त्यांना दिलासा मिळेल, असे नियोजन केले जावे, अशी अपेक्षा मांडण्यात आली आहे.
पुढील डोस प्राप्त झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण घेण्याचा विचार करू असे यंत्रणेने कळविले आहे. मात्र, तरीही त्यासाठी प्रस्ताव पाठवावा आणि ज्येष्ठ नागरिकांची लसीची चिंता दूर करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.