नाखरे येथे लसीकरण माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:21+5:302021-06-18T04:22:21+5:30

पावस : रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथे लसीकरण मोहीम घेण्यात आली. या वेळी ४५ वर्षांवरील १११ नागरिकांना लस ...

Vaccination campaign at Nakhre | नाखरे येथे लसीकरण माेहीम

नाखरे येथे लसीकरण माेहीम

पावस : रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथे लसीकरण मोहीम घेण्यात आली. या वेळी ४५ वर्षांवरील १११ नागरिकांना लस देण्यात आली.

लसीकरण करण्यासाठी पावस प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते. लसीकरणाच्या शिबिराला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बांधकाम व आरोग्य सभापती उदय बने तसेच पंचायत समिती सदस्य सुनील नावळे व विभागप्रमुख रविकिरण तोडणकर, पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गावीत यांनी भेट देऊन पाहणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सरपंच शुभदा नार्वेकर, उपसरपंच विजय चव्हाण, ग्रामसेवक मालुसरे, पोलीस पाटील सुधीर वाळिंबे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुरव, विद्या जाधव, शिवानी धुळप, प्रतीक्षा घवाळी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेवक, शाखा प्रमुख रामदास लांजेकर यांनी मेहनत घेतली.

Web Title: Vaccination campaign at Nakhre