लांजात प्रभागनिहाय लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST2021-06-04T04:24:24+5:302021-06-04T04:24:24+5:30
लांजा : लांजा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील प्रभागनिहाय कोरोना लसीकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी ...

लांजात प्रभागनिहाय लसीकरण करा
लांजा : लांजा
नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील प्रभागनिहाय कोरोना लसीकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी प्रांताधिकारी पोपट ओमासे यांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये होत असून, कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होऊन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. याच्यावर मात करायची असेल तर सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. वृद्ध नागरिक यांना लसीकरण केंद्रापर्यंत जाणे शक्य होत नाही, तसेच या नागरिकांना कधी लस देण्यात येणार आहे यांची माहितीही प्राप्त होत नसल्याने, तसेच ऑनलाईन प्रक्रिया यांना माहीत नसल्याने असे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू शकतात़ याकरिता नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील प्रभागनिहाय लसीकरण केले तर सर्व नागरिकांना याचा लाभ होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.
----------------------
लांजात प्रभागनिहाय लसीकरण करण्यासाठी भाजपचे नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी निवेदन दिले़