रत्नागिरी पंचायत समिती उपसभापतीपदी उत्तम सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:30+5:302021-04-02T04:33:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे उत्तम सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी पंचायत ...

Uttam Sawant as Ratnagiri Panchayat Samiti Deputy Chairman | रत्नागिरी पंचायत समिती उपसभापतीपदी उत्तम सावंत

रत्नागिरी पंचायत समिती उपसभापतीपदी उत्तम सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे उत्तम सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे.

रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीनंतर गुरुवारी उपसभापती पदासाठी निवडणुकीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जवळचे मानले जाणारे उत्तम सावंत यांचे नाव सभापतीपदाच्या निवडीवेळीच निश्चित करण्यात आले होते.

सभापती, उपसभापती पदासाठी शिवसेनेमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती सदस्याला संधी मिळावी, यासाठी सव्वा वर्षासाठी निवड करण्यात येते. त्याप्रमाणे सभापती, उपसभापती हे दोन्ही बदलण्यात आले. उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये उत्तम सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर सभापती संजना माने, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, उपसभापती व शिवसैनिकांनी नूतन उपसभापतींचे अभिनंदन केले.

Web Title: Uttam Sawant as Ratnagiri Panchayat Samiti Deputy Chairman