शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगणेशासमोर नतमस्तक होऊन ‘उस्तादां’नी जिंकले रत्नागिरीकरांचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:26 IST

रत्नागिरी : रंगमंचावर पाऊल ठेवताच श्रीगणेशासमाेर नतमस्तक हाेत उस्ताद झाकीर हुसेन यांनी रत्नागिरीकरांची मने जिंकली हाेती. त्यानंतर तबल्यावर जादुईने ...

रत्नागिरी : रंगमंचावर पाऊल ठेवताच श्रीगणेशासमाेर नतमस्तक हाेत उस्ताद झाकीर हुसेन यांनी रत्नागिरीकरांची मने जिंकली हाेती. त्यानंतर तबल्यावर जादुईने थिरकणारी बाेट, तबला वादनातून निघणारे वेगवेगळे आवाज यातून ‘उस्तादां’नी रत्नागिरीकरांना आपलेसे केले. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जाण्याने तब्बल सात वर्षांनंतरही रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमाची आठवण रत्नागिरीकरांच्या स्मरणात आहे.रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील प्रांगणात आर्ट सर्कलतर्फे कला-संगीत महोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा दि. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला सोलो वादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. रत्नागिरीत कार्यक्रमानिमित्त आलेल्या झाकीर हुसेन या पाहण्यासाठी आणि त्यांच्या तबला वादनाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली हाेती.

उस्ताद झाकीर हुसेन स्वत: दोन हातात तबला घेऊन रंगमंचावर आले आणि रंगमंचावर पाऊल ठेवताच समोरील श्रीगणेश मूर्तीसमोर नतमस्तक झाले, त्यांचा कलेप्रती असलेला आदर रत्नागिरीकरांना भावला आणि रत्नागिरीकरांनी त्यांच्या या कृतीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्याचवेळी त्यांच्या स्वागतासाठी ढोलवादन करण्यात आले. मराठमाेळ्या ढाेलवादनाचे आणि ढाेलवादकांचे उस्ताद झाकीर हुसेन यांनी काैतुकही केले.

रत्नागिरीकरांना मोहीत केले..तालाचे विविध प्रकार, तबल्यातून निघणारे नाद, त्याचबराेबर पावसाचे थेंब, वेगवेगळ्या छतावर पडणाऱ्या पावसाचा आवाज, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, कडाडणारी तोफ, महादेवाचा डमरू, शंखध्वनी, सुपरफास्ट रेल्वेचा आवाज तबल्याच्या माध्यमातून उस्ताद झाकीर हुसेन यांनी सादर करून रत्नागिरीकरांची मने जिंकली हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीZakir Hussainझाकिर हुसैन