शीर येथे सामूहिक भाजीपाला लागवडीचा प्रयोग

By Admin | Updated: January 23, 2015 00:47 IST2015-01-22T23:29:57+5:302015-01-23T00:47:40+5:30

शेतीशाळा व वेगवेगळ्या भाजीपाला लागवड प्रशिक्षणवर्गातून बचत गटातील महिलांनी प्रशिक्षण घेतले

Use of collective vegetable cultivation at Sheer | शीर येथे सामूहिक भाजीपाला लागवडीचा प्रयोग

शीर येथे सामूहिक भाजीपाला लागवडीचा प्रयोग

गुहागर : शीर - भाटले आंबेकरवाडी येथील ५ एकर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शीर भाटले - आंबेकरवाडी गटाने यशस्वीपणे भाजीपाला लागवड केली आहे. याची विशेष दखल घेऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी बचत गटाचे कौतुक केले.सरपंच शिवराम आंबेकर, कृषी विभाग, व पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली ५ वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बी. बी. पाटील, विस्तार अधिकारी बी. डी. कांबळे, कृषी सहाय्यक आर. के. जाधव यांच्या सहाय्याने भाजीपाला पिकाच्या लागवडीची सुरुवात केली. यासाठी शेतीशाळा व वेगवेगळ्या भाजीपाला लागवड प्रशिक्षणवर्गातून बचत गटातील महिलांनी प्रशिक्षण घेतले. यामधून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन योग्य व्यवस्थापन, कीटकनाशके, बुरशीनाशकांची वेळीच फवारणी केली. २ आॅक्टोबर २००९ रोजी स्थापन झालेल्या या गटाला बँक आॅफ इंडिया आबलोली शाखेने १४ लाख ५० हजार रुपये इतके कर्ज दिले. अश्विनी आंबेकर, रोहिणी आंबेकर, सुश्मिता आंबेकर, प्राजक्ता आंबेकर, कल्पना आंबेकर, सुवर्णा आंबेकर, चंद्रभागा मोरे, रंजिता आंबेकर, वनिता आंबेकर, वैशाली आंबेकर आदी १९ सदस्य काम करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Use of collective vegetable cultivation at Sheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.