बिजघर येथे सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST2021-04-03T04:27:36+5:302021-04-03T04:27:36+5:30

khed-photo21 खेड तालुक्यातील बिजघर - तिसंगी येथे सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण खेडचे सभापती विजय कदम यांच्याहस्ते करण्यात आले. लाेकमत ...

Unveiling of the nameplate of the service center at Bijghar | बिजघर येथे सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण

बिजघर येथे सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण

khed-photo21

खेड तालुक्यातील बिजघर - तिसंगी येथे सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण खेडचे सभापती विजय कदम यांच्याहस्ते करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : तालुक्यातील बिजघर येथे श्री संप्रदाय सेवा समितीच्या सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण सभापती विजय कदम यांच्याहस्ते करण्यात आले.

नाणीज (ता. रत्नागिरी) येथील नरेंद्राचार्य महाराज व पीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथील बिजघर - तिसंगी येथे श्री संप्रदाय सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या सेवा केंद्राचा नामफलक अनावरण सोहळा पार पडला. यावेळी पंचायत समिती सदस्य राजू कदम, तिसंगी गावचे पोलीसपाटील संतोष मोहिते, सेवा केंद्र अध्यक्ष सुनील लाड, अरविंद निकम, दिनेश जाधव, भाऊ भोसले उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा सेवा समितीचे निरीक्षक भाई जामदार, सेवाध्यक्ष सुनील वीर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दतात्रय मोरे, तालुका सेवाध्यक्ष दगडू नेवरे, खेड तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय भोसले आणि खेड तालुक्यातील सर्व सेवा केंद्र अध्यक्ष यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Web Title: Unveiling of the nameplate of the service center at Bijghar