विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी कायम

By Admin | Updated: March 25, 2015 00:44 IST2015-03-24T21:41:17+5:302015-03-25T00:44:25+5:30

--लोकमतचा प्रभाव

The university's wage hiring worker | विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी कायम

विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी कायम

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठातील रोजंदार कर्मचाऱ्यांना कायम केल्याची घोषणा कृ षी मंत्र्यांनी केल्यामुळे त्यांना २० ते २५ वर्षांनी न्याय मिळाला आहे.रोजंदार कर्मचाऱ्याने न्याय मिळवण्यासाठी अनेक वेळा शासनाचे उंबरठे झिजवले होते. परंतु, गेली अनेक वर्षे त्यांना न्याय मिळाला नव्हता. आघाडी सरकारच्या काळात अनेकवेळा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्याच्या घोषणा केल्या जात होत्या. परंतु, अगदी तुटपुंज्या पगारात त्यांना उदरनिर्वाह करावा लागत होता. मात्र, तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांनी रोजंदार कर्मचाऱ्यांची बाजू सरकारकडे मांडली व त्यानंतर मात्र सरकारला जाग आली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोजंदार कर्मचाऱ्याची फाईल विद्यापीठाकडून मागवली व आपल्याला मुख्यमंत्री न्याय देतील, असे वाटत असतानाच निवडणूका लागल्या व सरकार बदलले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोजंदार कर्मचाऱ्याबद्दल सकारात्मक दाखविला होता. तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांनी पाठपुरावा करुन त्यांना पुरेपूर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदार कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्यासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता. रोजंदार कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडून शासनाला जाग आणण्याचे कामदेखील केले होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुुरु डॉ. किसन लवांडे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली होती.

Web Title: The university's wage hiring worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.