शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवशी फाट्याजवळील अपघातात विद्यापीठातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:35 IST

चढामध्ये कंटेनर अचानक मागे आल्याने कंटेनरच्या मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना दापोली तालुक्यातील नवशी फाटाजवळ सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दगावलेली व्यक्ती विद्यापीठातील कर्मचारी आहे.

ठळक मुद्देनवशी फाट्याजवळील अपघातात विद्यापीठातील कर्मचाऱ्याचा मृत्यूकंटेनर चढामध्ये बंद पडून उलट्या दिशेने आला मागे

दापोली : चढामध्ये कंटेनर अचानक मागे आल्याने कंटेनरच्या मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना दापोली तालुक्यातील नवशी फाटाजवळ सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दगावलेली व्यक्ती विद्यापीठातील कर्मचारी आहे.दापोली तालुक्यातील टेटवली येथील कदमवाडीतील सुरेश कात्रे (४५) हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागात कामाला होते. ते सकाळी आपल्या कर्तव्यावर निघाले होते.कुंभवे नदी या पुलावरून जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या पुढे पूर्ण क्षमतेने भरलेला एक कंटेनर खेडकडून दापोलीकडे जात होता. हा कंटेनर चढामध्ये बंद पडून उलट्या दिशेने मागे आला. या कंटेनरच्या मागून सुरेश कात्रे हे आपली दुचाकी घेऊन दापोलीकडे येत होते.

अचानकपणे मागे येणाऱ्या कंटेनरने त्यांना चिरडले. या अपघातात सुरेश कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेश कात्रे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी