पालघर येथील डोहात सापडला अनोळखी मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:39+5:302021-08-14T04:36:39+5:30

मंडणगड : तालुक्यातील भारजा नदीपात्रात पालघर येथील अडत डोह येथे ११ ऑगस्ट राेजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान ५५ वर्षांचा ...

An unidentified body was found in a pond at Palghar | पालघर येथील डोहात सापडला अनोळखी मृतदेह

पालघर येथील डोहात सापडला अनोळखी मृतदेह

मंडणगड : तालुक्यातील भारजा नदीपात्रात पालघर येथील अडत डोह येथे ११ ऑगस्ट राेजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान ५५ वर्षांचा अनाेळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

याबाबत केळवत गावाचे पोलीस पाटील विनोद भोसले यांनी मंडणगड पोलीस स्थानकात माहिती दिली. पालघर परिसरातील अडत डोह येथे पाण्यावर तरंगताना हा मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा नसून मृतदेहाची उंची सुमारे साडेपाच फूट आहे. अंगाने सडपातळ गोल चेहरा व डोक्यावरील केस पिकलेल्या स्थितीत आहेत. मृतदेहाच्या नातेवाईक व वारसांचा तपास सुरू असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी.एस. बाणे हे करीत आहेत. या संदर्भात अधिकच माहिती असल्यास मंडणगड पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस स्थानकातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: An unidentified body was found in a pond at Palghar