शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून 'ति'ने पोटच्या लेकीला सोडले निर्जनस्थळी, मुलीची अवस्था पाहताच घेतली पाेलीस स्थानकात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 12:13 IST

फाेटाेतील मुलीची अवस्था पाहून तिला अखेर पाझर फुटला. अखेर ती देवरुख पाेलीस स्थानकात स्वत:हून हजर झाली.

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील पऱ्याजवळील पुलाखाली चार दिवसांपूर्वी एक वर्षाची बालिका सापडली हाेती. त्याबाबत पाेलिसांनी साेशल मीडियावर बालिकेचा फाेटाे टाकून माहिती देण्याचे आवाहन केले हाेते. मुलीचा फाेटाे तिच्या आईपर्यंत पाेहाेचला आणि मुलीची अवस्था पाहून ती स्वत: देवरुख पोलीस स्थानकात शुक्रवारी हजर झाली.

देवरुख पाेलिसांनी सांची स्वरुप कांबळे (२६, रा. कुवारबाव बाजारपेठ, रत्नागिरी) आणि मिथिल उर्फ मिथिलेश मदन डांगे (२३, डांगेवाडी - हातखंबा, रत्नागिरी) या दाेघांना ताब्यात घेतले आहे. सांची हिला पहिला मुलगा असून, दुसरी मुलगी झाली. नवरा दारु पिणारा त्यात मुलीची जबाबदारी पडल्याने तिला ती नकुशी झाली हाेती. त्यानंतर तिने मिथिल याच्या साथीने या मुलीला संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील एका पुलाखाली निर्जनस्थळी ठेवले हाेते. तर याप्रकरणी पाेलिसांनी हातखंबा येथून तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र, तिने मुलीला तिथे का ठेवले याचे कारण कळू शकलेले नाही. त्याचा शाेध देवरुख पाेलीस घेत आहेत. पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसांपूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्थळी सापडली हाेती. चार दिवस थंडीत राहिल्यामुळे तिचा आवाजही बसला हाेता. तेथील ग्रामस्थांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते.

पोलीस प्रशासनाकडून या मुलीच्या आईचा शोध सुरू हाेता. त्याचबराेबर पाेलिसांनी सोशल मीडियावर मुलीचा फोटो व तिच्या बद्दलची माहिती टाकली होती. जर कोणाला या मुलीविषयी किंवा तिच्या घरच्यांविषयी माहिती असल्यास तत्काळ देवरूख पोलीस, कंट्रोल रूम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले हाेते. साेशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट या मुलीच्या आईपर्यंत पाेहाेचली. त्या फाेटाेतील मुलीची अवस्था पाहून तिला अखेर पाझर फुटला. अखेर शुक्रवारी ती देवरुख पाेलीस स्थानकात स्वत:हून हजर झाली. अधिक तपास पाेलीस करत आहेत.

मुलीची प्रकृती ठणठणीतनिर्जनस्थळी सापडलेल्या मुलीला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. इवल्याशा मुलीला पाहून रुग्णालयातील कर्मचारीही गहिवरले. परिचारिकांनी तिला कवटाळून तातडीने उपचार सुरु केले. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु केले. या मुलीची प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी