दलित वस्ती सुधारणाअंतर्गत पाच तालुक्यांना दोन कोटी
By Admin | Updated: August 13, 2014 23:32 IST2014-08-13T22:22:13+5:302014-08-13T23:32:48+5:30
रत्नागिरी जिल्हा : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून निधी

दलित वस्ती सुधारणाअंतर्गत पाच तालुक्यांना दोन कोटी
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दलित वस्ती सुधारणाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांना दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत बौद्ध वस्त्यांमधील डांबरीकरण, गटार बांधणे, रंगमंच बांधणे, नळपाणी योजना तयार करणे इत्यादी महत्त्वाची कामे सुचवण्यात आली होती. या कामांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होण्यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. मंजुरीनंतर ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. नीलेश राणे यांच्या पुढील दौऱ्यावेळी या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
दि. १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाला सूचित केलेल्या यादीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील चिपळूण - मिरजोळी कोलेखाजण रस्ता डांबरीकरण करणे, भिले - बौद्धवाडी सभागृह बांधणे, पेढे - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, कुडप - बौद्धवाडी समाजमंदिर बांधणे, हडकर्णी - बौद्धवाडी पुलापासून बुध्द विहारापर्यंत रस्ता डांबरीकरण, खेरशेत - बौद्धवाडी सभागृह बांधणे, तळसर मुख्य रस्ता ते मधली बौद्धवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, कोळकेवाडी - बौद्धवाडी सभागृह बांधणे, मांडकी - बौद्धवाडी सभागृह बांधणे, सावर्डे - बौद्धवाडी विहीर बांधणे, आगवे - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, टेरव - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, वाशीतर्फ देवरुख भालेकरवाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, तुळसणी कातकरवाडी बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, कोंड्ये वगडे फाटा ते बौद्धवाडी खंडाळेश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण, रत्नागिरी तालुक्यातील विलये - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण करणे, तोणदे - बौद्धवाडी नळपाणी पुरवठा योजना तयार करणे, मावळंगे जाधववाडी गुरववाडी ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, मिरजोळे - बौद्धवाडी ग्रंथालय बांधणे, फणसवळे - बौद्धवाडी पाखाडी बांधणे, शिवरेवाडी - बौद्धवाडी संरक्षक भिंत बांधणे, शिवरेवाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, दांडे आडोम ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, लांजा तालुक्यातील विलवडे - बौद्धवाडी रंगमंच बांधणे, भांबेड - बौद्धवाडी रंगमंच बांधणे, कोंडगे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, आसगे मराठी शाळा ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, तळवडे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, जावडे कातळगाव ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, शिपोशी कसाळघर ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, कोट सोमेश्वर मंदिर ते बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, रिंगणे बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, राजापूर तालुक्यातील जवळेथर पाटीलवाडी - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, मिठगवाणे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, पाचल - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, ताम्हाणे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण, तुळसरे - बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)