लांजा : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेली जागा संपादन करण्यासाठी लांजा शहरातील मार्गाच्या दुतर्फा साडेबावीस मीटर अंतरावर करण्यात आलेल्या खुणा व रेषेंतर्गत असलेली पक्की बांधकामे स्वतःहून पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी महामार्ग विभागाने पोलीस बंदोबस्तात या बांधकामांवर धडक कारवाई करत ती तोडली.लांजातील मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेले वर्षभर रखडले होते. महामार्गाचे काम जलदगतीने व्हावे तसेच शहरातील उड्डाणपुलाचे काम करावयाचे असल्यास त्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा बायपास रस्ता करणे आवश्यक असल्याने शहरातील संबंधित जागामालक व दुकानदार यांची दुकाने हटवल्याशिवाय पर्यायी मार्ग काढणे अवघड झाल्याने महामार्ग विभागाने शहरामधील पक्क्या बांधकांमावर मंगळवारी व बुधवारी कारवाई करणार असल्याची सूचना दिली होती.दिलेल्या सुचनेनुसार महामार्ग विभागाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी सकाळपासून लांजा बाजारपेठेतील पक्की बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरु होती. दिवसभर लांजात या कारवाईचीच चर्चा सुरू होती. ही कारवाई होणार की नाही, कधी होणार, त्याला विरोध होईल का, अशा अनेक शंका होत्या. मात्र रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली .
लांजातील अनधिकृत बांधकामे अखेर तोडलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:48 IST
Lanja Nagar Panchayat Ratnagiri- मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेली जागा संपादन करण्यासाठी लांजा शहरातील मार्गाच्या दुतर्फा साडेबावीस मीटर अंतरावर करण्यात आलेल्या खुणा व रेषेंतर्गत असलेली पक्की बांधकामे स्वतःहून पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी महामार्ग विभागाने पोलीस बंदोबस्तात या बांधकामांवर धडक कारवाई करत ती तोडली.
लांजातील अनधिकृत बांधकामे अखेर तोडलीच
ठळक मुद्देलांजातील अनधिकृत बांधकामे अखेर तोडलीचबाजारपेठेतील कारवाईची सगळीकडे चर्चा