सावर्डेतील १७ गावांतील आशा स्वयंसेविकांना दिल्या छत्र्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:05+5:302021-05-12T04:32:05+5:30
अडरे : जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिपळूण पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या व माजी सभापती पूजा निकम यांनी ...

सावर्डेतील १७ गावांतील आशा स्वयंसेविकांना दिल्या छत्र्या
अडरे : जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिपळूण पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या व माजी सभापती पूजा निकम यांनी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सतरा गावांतील आशा सेविकांना छत्र्यांचे वाटप केले.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात वाडी-वस्त्यांवर जाऊन माहिती गोळा करण्याचे काम आशा सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता आशा सेविका कडक उन्हाळ्यातही काम करत आहेत. पूजा निकम यांनी स्वखर्चातून सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सतरा गावांतील सर्व आशा सेविकांना गावा-गावातील प्रमुखांच्याहस्ते छत्र्यांचे वाटप केले.
या आणीबाणीच्या कालावधीत परिसरातील सर्व कामांवर लक्ष ठेवून असणाऱ्या व सहकार्याची भूमिका ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पूजा निकम यांनी केले आहे.
-----------------------
चिपळूण तालुक्यातील सावर्डे प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत पूजा निकम यांनी आशा सेविकांना छत्र्यांचे वाटप केले़.