उमाजी नाईक यांनी स्वराज्याचा दुसरा लढा उभारला : नरेंद्र तेंडाेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:08+5:302021-09-12T04:36:08+5:30
देवरुख : उमाजी नाईक यांचा लढवय्या, क्रांतिकारक व प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी योद्धा म्हणून असणारे कर्तृत्व लक्षवेधी ...

उमाजी नाईक यांनी स्वराज्याचा दुसरा लढा उभारला : नरेंद्र तेंडाेलकर
देवरुख : उमाजी नाईक यांचा लढवय्या, क्रांतिकारक व प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी योद्धा म्हणून असणारे कर्तृत्व लक्षवेधी आहे. राजे उमाजींना इंग्रजांनी नाईक ही पदवी बहाल केली होती. राजे उमाजींचा लढाऊपणा, बेडरपणा, प्रामाणिकपणा, जाज्वल्य शिवनीती, कणखर देशभक्ती, जनतेत असलेला आदरयुक्त दरारा, सैन्यावरील वचक यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्याचा दुसरा लढा उभारला, असे आदरयुक्त उद्गार प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी व्यक्त केला.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. सीमा कोरे, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. धनंजय दळवी, श्वेता सुर्वे आणि सहाय्यक अमोल वेलवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग, ग्रंथालय विभाग व प्रसिद्धी विभागातर्फे करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राजे उमाजी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन कोविड-१९ नियमानुसार पुरेसे सामाजिक अंतर ठेवून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षिका मीता भागवत आणि ग्रंथालय सहाय्यक स्वप्निल कांगणे यांनी मेहनत घेतली.
110921\20210911_115842.jpg
फोटो- राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, प्रा. दळवी, प्रा.कोरे