शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बारसूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास..; आमदार राजन साळवींचा इशारा

By मनोज मुळ्ये | Updated: May 2, 2023 17:10 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका मान्य

रत्नागिरी : ज्या पक्षामुळे नारायण राणे यांना मानसन्मान मिळाला. ज्या पक्षामुळे राणे आणि त्यांच्या मुलांमध्ये बोलण्याची धमक आली, त्या पक्षाच्या प्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना अडवण्याची भाषा त्यांनी करु नये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसूमध्ये येऊन ग्रामस्थांशी बोलतील. त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिला.रत्नागिरीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार साळवी यांनी ही भूमिका मांडली. रिफायनरी प्रकल्पाला आपण समर्थन केले असले तरी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका आपल्याला मान्य असेल, हे आपण याआधीच स्पष्ट केले आहे. तीच भूमिका आपली कायम आहे, असे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना आमदार साळवी यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. नारायण राणे यांना शिवसेनेमुळेच मानसन्मान मिळाला. शिवसेनेने बाळकडू दिले म्हणूनच राणे आणि त्यांच्या मुलांमध्ये बोलण्याची धमक आली आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना अडवण्याची भाषा करु नये. त्यांना आधी आमच्याशी संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी नारायण राणे यांना दिला.

उद्धव ठाकरे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी येणारचजिल्ह्यात मनाई आदेश असतानाही ठाकरे यांचा दौरा होत आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले की, नियमांची काळजी प्रशासनाने घ्यावी. उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी येणारच. त्यांचा दौरा रद्द होणार नाही.

उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील, ती मान्यच आमदार साळवी यांनी रिफायनरीचे समर्थन केले आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, रोजगाराचा विचार करुन मी या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी आपली भूमिका आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्यच असेल.

त्याबाबत आपली नाराजीग्रामस्थांनी आंदोलन करुनही स्थानिक आमदार म्हणून आपण तेथे गेला नाहीत, अशी लोकांची भावना होती, असा प्रश्न करण्यात आला असता आमदार साळवी म्हणाले की, माझे या प्रकल्पाला समर्थन असल्याने तेथे गेलो नव्हतो. मात्र बारसूमध्ये लोकांवर जबरदस्ती करण्यात आली आहे. त्याबाबत आपली नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याप्रसंगी आपण तेथे जाणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Salviराजन साळवी