शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

uddhav thackeray: "मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय", ठाकरेंची निवडणुक आयोगावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 19:40 IST

uddhav thackeray news: उद्धव ठाकरे यांनी खेड येथील जाहीर सभेत निवडणुक आयोग आणि भाजपावर बोचरी टीका केली आहे. 

खेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेड शहरातील एस. टी. मैदानात जाहीर सभा सुरु आहे. गोळीबार मैदानात सुरू असलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपासह निवडणुक आयोगावर बोचरी टीका केली. देव माणसांचं दर्शन घ्यायला आलोय, असं म्हणत ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. आज माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, तरीदेखील तुम्ही इथे जमलात यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केले - ठाकरे तुमची मला साथ आणि आशीर्वाद हवेत अशी भावनिक साद ठाकरेंनी घातली. जे गद्दार आहेत, ते शिवसेना हे नाव चोरू शकतील पण शिवसेना चोरू शकत नाहीत. कारण त्यांना धनुष्यबाण पेलणार नाही अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. निवडणुक आयोगाला मोतिबिंदू झाला नसेल तर शिवसेना काय आहे ते पाहायला या. निवडणुक आयोग गुलाम आहे, ते त्या लायकीचे नाहीत. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलेय त्यांच्या वडिलांनी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणुक आयोगाचा समाचार घेतला. 

"मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय" दरम्यान, तुम्ही शिवसेना नाही तर मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घालत आहात. भारतीय जनता पक्षाला गल्लीतलं कुत्रं विचारत होत का? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला. निवडणुक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, ते चिन्हं, नाव देऊ शकत असेल पण शिवसेना आमची आई आहे, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे