शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते भास्कर जाधव यांचे निवृत्तीचे संकेत, कार्यकर्ते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:14 IST

'ती' खंत अजूनही मनात कायम राहिली

चिपळूण (जि.रत्नागिरी) : उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते आमदार भास्कर जाधव यांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, पक्षाच्या पडत्या काळात विरोधकांवर तुटून पडणाऱ्या या नेत्याच्या संभाव्य निवृत्तीने उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.गेली ३५ ते ४० वर्षे आमदार भास्कर जाधव हे सक्रिय राजकारणात आहेत. आता राजकारणात थांबावेसे वाटते, अशी भूमिका त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली. त्यांचे हे विधान पक्षांतर्गत नाराजीतून आले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षांतर्गत आपले विरोधक, विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहीर करण्यास झालेला उशीर, नाव जाहीर झाल्यानंतरही त्याला होत असलेला विलंब याबाबत त्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आमदार जाधव यांनी ‘थांबण्या’चा मुद्दा काढल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

'ती' खंत अजूनही मनात कायम राहिली

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. मात्र, मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची खंत आजही त्यांच्या मनात आहे. त्यांनी ती बोलूनही दाखविली आहे.

भास्कर जाधव यांचे स्पष्टीकरण

  • मी नाराज असल्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. माझ्या मनात नसलेल्या गोष्टींवर मी खुलासा करत नाही.
  • पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मी भाषण केलं, त्यात कुठेही नाराजीचा लवलेश दिसला का? मी कशाला नाराज होईन?
  • मी आधी कृती करतो, मग बोलतो. यावेळीही मी स्वतःहून पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घेतली आहे. ही माझी निष्ठा आणि पक्षनिष्ठा दर्शविणारी कृती आहे.
  • सहा वेळा निवडून आल्यानंतर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे, पण अजूनही माझ्यात संघर्ष करण्याची ताकद आहे.