शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant: रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा

By रहिम दलाल | Updated: September 18, 2022 14:06 IST

Uday Samant: ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

- रहिम दलाल रत्नागिरी : ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वाडिया हॉस्पिटल आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयात लहान मुलांची मोफत २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनानिमित्ताने ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मजगाव रोड येथील रुग्णालयाच्या इमारतीमधील जागा या रुग्णालयासाठी वापरायला देण्यास रत्नागिरी नगर परिषद तयार आहे. जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील माणूस यांच्यावर पैशामुळे उपचार होत नाहीत अशी मानसिकता निर्माण झाली आहे. ती देखील दूर करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळणार आहे. असे उदगार सामंत यांनी काढले. आईच्या पोटात असलेल्या बाळाला हृदय रोग असेल तर कुठचीही शस्त्रक्रिया न करता त्या बाळाला बरे करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशामध्ये पहिल्यांदा करणार आहेत. म्हणून आम्ही त्यांचे चाहते आहोत. खोके, ओके वगैरे जाऊ देत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी