शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:01 IST

दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पातून दापोलीकरांचे स्वस्तात घरे मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देदापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा जागेची पाहणी, रिक्षामालकांना मिळणार २ लाखांची सवलत

दापोली : दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पातून दापोलीकरांचे स्वस्तात घरे मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.यावेळी सामंत पुढे म्हणाले की, दापोली येथे या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण २६० घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ३३० चौरस फुटाची १६० घरे तर मोठ्या गटासाठी ४५० चौरस फुटाची १०० घरे याठिकाणी उपलब्ध होतील, अशी माहिती दिली. दापोली शहरात नगरपंचायत हद्दीत कोकण म्हाडाची एकूण ७.५ हेक्टर जागा असून, या जागेची पाहणी आमदार उदय सामंत यांनी केली.लवकरच अंदाजपत्रक बनवून या विषयाला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल व येत्या काही दिवसात दापोलीतील प्रकल्पाचे•भूमिपूजन करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. या घरांसाठी अडीच लाख रूपयांची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पात दापोलीकरांसाठी एक सुसज्ज कम्युनिटी हॉल किंवा सांस्कृतिक सभागृह याबाबत नगरपंचायतीकडून जो प्रस्ताव येईल, त्यानुसार बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण म्हाडा प्रकल्पात रिक्षामालक जर घर खरेदी करणार असेल तर १ लाख रुपये व कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असेल तर २ लाख रूपयांची सवलत दरात देण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली. या प्रकल्पासाठी नियमानुसार लॉटरी काढण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किंवा बांधकाम करण्याच्या आधी त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.आपण कायम सेनेतेचआपण कायम शिवसेनेमध्येच असून, याचठिकाणी भविष्यात निवृत्त होऊ. आपल्याबद्दल चालू असलेल्या चर्चा या धादांत खोट्या असून, केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्नागिरीत सभा घेतली होती, तरीही शिवसेचाच उमेदवार म्हणून मी निवडून आलो. रत्नागिरीत आपल्यासमोर कोणीही उभे राहावे, असे आव्हान त्यांनी दिले.

टॅग्स :mhadaम्हाडाUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी