दोन वर्षांचे एस. टी. अपघात केवळ दोन महिन्यांत!
By Admin | Updated: May 29, 2014 00:44 IST2014-05-29T00:44:44+5:302014-05-29T00:44:52+5:30
रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने

दोन वर्षांचे एस. टी. अपघात केवळ दोन महिन्यांत!
रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने मात्र एस्. टी.साठी त्रासदायक ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांत अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांतील अपघातांच्या संख्येएवढे अपघात अवघ्या दोन महिन्यात झाले आहेत. एस. टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बनली आहे. डोंगरदर्यांमध्ये वसलेला जिल्ह्यातील ग्रमीण समाज एस. टी.मुळे शहराशी जोडला गेला आहे. शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी असो वा शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात काम करणारे कर्मचारी असोत. सर्वांसाठी एस. टी. फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागातून दिवसाला किमान चार ते पाच फेर्या होतच असतात. एस. टी.चे भारमान, फेर्या, एस. टी.ची संख्या वाढली आहे. मात्र सर्वात भरवशाची ही सेवा आता त्रासदायक होऊ लागली आहे. मागील पाच वर्षांत एस. टी.चे वर्षाला किमान बारा अपघात झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दोन महिन्यात तर गेल्या दोन वर्षांतील अपघाताची संख्या भरून काढली गेली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तत्काळ मदत दिली जाते. अपघाताच्या स्वरूपावरून मदतीची रक्कम ठरविण्यात येते. २००८-०९ मध्ये ७३ हजार २ रूपये, २००९-१०मध्ये ६१ हजार ६५० रुपये, १०-११ मध्ये ७१ हजार २०० रूपये, ११-१२ मध्ये १ लाख ६५ हजार ३०० रूपये, तर १२-१३मध्ये ५३,२०० रूपयांची मदत देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र अपघाताने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला0 आहे. मार्चमध्येच १० अपघात झाले असून, या अपघातामध्ये ३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ३४ हजार ४२१ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये १२ अपघात घडले असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ७२ हजार १२ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघातानंतर तत्काळ मदत दिली जाते. न्यायालयीन निकालानंतर अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येते. गेल्या पाच वर्षांचा आलेख पाहता वर्षाला सरासरी १२ अपघात होत आहेत. म्हणजेच सरासरी दर महिन्याला एक अपघात होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात मात्र दोन वर्षांतील अपघाताएवढे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)