रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील दुचाकी चाेरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:55+5:302021-09-11T04:32:55+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमधील दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ...

रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील दुचाकी चाेरीला
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमधील दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याचा सुमारास घडली.
याबाबत अशोक गंगाराम पवार (५९, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी आपली पॅशन दुचाकी (एमएच ०८, जे ७८११) रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये ४ ऑगस्ट राेजी पार्क केली होती. त्यानंतर ते कामानिमित्त मुंबईला गेले हाेते. पुन्हा ते रत्नागिरीत ५ सप्टेंबर राेजी आले असता त्यांना पार्किंगमध्ये दुचाकी दिसली नाही. गाडीचा इतरत्र शाेध घेतल्यानंतर ती सापडली नाही. गाडी चाेरीला गेल्याची खात्री हाेताच त्यांनी रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस नाईक रोशन सुर्वे करत आहेत.