दापाेली शहरातून दुचाकी चाेरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:34+5:302021-03-30T04:19:34+5:30
दापाेली : शहरातील केळस्कर नाका येथून उभी केलेली दुचाकी चोरी केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दापाेली पाेलीस ...

दापाेली शहरातून दुचाकी चाेरीला
दापाेली : शहरातील केळस्कर नाका येथून उभी केलेली दुचाकी चोरी केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दापाेली पाेलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आली असून, पाेलिसांनी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, राेशन बाळकृष्ण धामणे (२८, रा.काजरेवाडी, आसूद, दापाेली) यांची एमएच ०८, एआय २७३७ या क्रमांकाची केटीएम २००ड्युक कंपनीची गाडी हाेती. ते वळणे एमआयडीसी येथील आइसक्रीम फॅक्टरीमध्ये नोकरी करतात. रविवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी दुचाकी केळस्कर नाका येथे पार्किंग करून ठेवली होती. काही वेळाने ते गाडी उभी करून ठेवलेल्या जागी आले असता, त्यांना गाडी दिसली नाही. या गाडीची किंमत सुमारे ५५ हजार रुपये इतकी आहे. गाडी चाेरीला गेल्याचे कळताच, त्यांनी दापाेली पाेलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली आहे. दुचाकी चोराने डोके वर काढल्याने दुचाकीस्वारांमधून चिंता व्यक्त होत आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सुकाले करत आहेत.