शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Accident: कशेडी घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:59 IST

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

खेड : ओव्हरटेक करत असताना समाेरुन येणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अथर्व माेहन सावंत (वय-२५, रा. पेढांबे, ता. चिपळूण) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मुंबई - गाेवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील धामणदेवी (ता. पाेलादपूर) हद्दीत आज, मंगळवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.याबाबत माहिती अशी की, दुचाकीला धडक दिलेला ट्रक (एमएच ०४, डिके ७२५८) तळोजा ते लोटे असा जात हाेता. या ट्रक वरील चालकाने ओव्हरटेक करून विरुद्ध दिशेला जाऊन समाेरुन येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०८, एव्ही ३७२६) ठाेकले. ही धडक इतकी भीषण हाेती की, चालक अथर्व सावंत याचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्गाचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकरही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केले. जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तसेच अपघाताची खबर मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, नवनाथ घोलप यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.यावेळी मुकुंद मोरे, सनी जाधव, विघ्नेश जाधव यांनी घटनास्थळी पोलिसांना मदत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात