शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी पुलावरून कोसळून राजापुरातील तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:12 IST

Accident, Bike, Ratnagiri, rajapur भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडला.

ठळक मुद्देदुचाकी पुलावरून कोसळून राजापुरातील तरुण जागीच ठार हर्डी कातळडा धबधब्यानजीक अपघात

राजापूर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडला.पुलाखाली असलेल्या दगडावर आपटून गंभीर दुखापत झाल्याने गौरव जागीच गतप्राण झाला. तो राजापूरहून भू गावाकडे जात असताना हा अपघात घडला. भरधाव वेगामुळे हर्डी कातळडा धबधब्यानजीक गौरवला दुचाकीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तो रस्ता सोडून या पुलावरुन खाली कोसळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस हवालदार बबन जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नगरसेवक सौरभ खडपे, आंबेवाडीतील सतीश बंडबे, संतोष कातकर, मंदार बंडबे, भास्कर कुवळेकर, दादू बोटले आदींसह या परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनाम्यानंतर पोलिसांनी सौरभ याचा मृतदेह विच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.भावाने ओळखलेअपघातात मृत्यमूमुखी पडलेल्या गौरव याचा भाऊ याच मार्गावरून जात होता. त्याला याबाबत माहिती मिळाली असता तो घटनास्थळी दाखल झाला. त्याने सौरभला ओळखले. भावाचा मृतदेह समोर पाहून तोही हादरून गेला.सुट्टीमुळे राजापुरात आलागौरव जाधव हा सेंटरींगचे काम करतो, बुधवारी सुट्टी असल्याने तो राजापूर शहरात आला होता. राजापुरातून घरी जात असताना हा अपघात झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीbikeबाईकRajapurराजापुर