शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोल्हापुरातील व्यावसायिकाची दुचाकी आढळली आंबा घाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:17 IST

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ एमएच ०९ डीजे ४८६३ या क्रमांकाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली आहे. असित गोरधनभाई सुतरिया (५२, राजारामपुरी, १३वी गल्ली, अपूर्वा टॉवर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या व्यावसायिकाची ही दुचाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा घात की अपघात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

ठळक मुद्देव्यावसायिक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल, घात की अपघात याचा शोध सुरूपोलिसांना आढळला दुचाकीपासून काही अंतरावर मोबाईल

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ एमएच ०९ डीजे ४८६३ या क्रमांकाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली आहे. असित गोरधनभाई सुतरिया (५२, राजारामपुरी, १३वी गल्ली, अपूर्वा टॉवर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या व्यावसायिकाची ही दुचाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा घात की अपघात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.असित सुतरिया हे सनमाईक मार्केटिंगकरिता २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमाराला गेले होते. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातून ते बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते बेपत्ता असल्याची माहिती चेतन गोपाळ चांगेला (४५, रा. कोल्हापूर) यांनी २६ सप्टेंबर रोजी साखरपा पोलीस स्थानकात दिली आहे.

दुचाकीपासून काही अंतरावर एक मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. या मोबाईलद्वारे काही माहिती मिळते का, याचा शोध सुरू आहे. कोल्हापूर येथील व्यावसायिकाची दुचाकी आंबा घाटात सापडल्याने हा घात आहे की अपघात याचे गूढ निर्माण झाले आहे.या तपासासाठी साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, सहाय्यक पोलीस फौजदार संजय उकार्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदेश जाधव आणि सहकारी, राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी शोध मोहीम राबवली. मात्र, त्यांच्या हाती अन्य कोणतीच पुरावा आढळलेला नाही.बेपत्ता व्यक्तीचे वर्णनबेपत्ता झालेल्या व्यक्तीची उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. अंगात जांभळ्या रंगाचे फुल शर्ट, काळ्या रंगाची पँट, हातात घड्याळ, पायात स्पोर्ट्स बूट, काळ्या रंगाची सॅक, नोकिया कंपनीचा मोबाईल होता. २४ सप्टेंबरपासून ही व्यक्ती बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस