शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरातील दोन विनापरवाना कातभट्ट्या वनविभागाकडून सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:31 IST

खैर तोडीवरही निर्बंध

राजापूर : विनापरवाना सुरू असलेल्या दोन कातभट्ट्या राजापूर वनविभागाने सील केल्या आहेत. कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राजापूर वनविभागाकडून देण्यात आली.पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. जिल्हा वनविभागाने सर्वच कातभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत.राजापूर तालुक्यात एकूण चार कातभट्ट्या होत्या. यापैकी दोन कातभट्ट्या गेली काही वर्षे बंद आहेत. राजापूर शहरानजीक उन्हाळे येथे पन्हळेकर हर्बल प्रॉडक्ट्स व मठखुर्द येथे परब कातउद्योग समूह अशा दोन कातभट्ट्या सुरू होत्या. राजापूर वनविभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये या दोन्ही कातभट्ट्यांवर छापा टाकून सुमारे १,४४० किलो इतके कातद्रव्य जप्त केले होते.विनापरवाना कातभट्टी चालविल्याप्रकरणी या दोन्ही कातउद्योगाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.

आता वनविभागाने ६ व ७ फेब्रुवारी रोजी या दोन्ही कातभट्ट्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मालकांच्या समक्ष त्या सील केल्या आहेत.

खैर तोडीवरही निर्बंधखैराच्या झाडावर प्रक्रिया करून त्यापासून कात बनवला जातो. वर्षानुवर्षे जिल्ह्यात हे व्यवसाय सुरू आहेत. त्यातही चिपळूण तालुक्यात खैर लागवड आणि कातभट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. वनविभागाने तेथेही अनेक ठिकाणी छापे टाकून कातभट्ट्या बंद केल्या आहेत. पर्यावरणाच्या मुद्यावरुन खैर तोडीवर निर्बंध आहेत. ते कात भट्ट्यांसाठीच तोडले जात असल्याने अशा भट्ट्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरforest departmentवनविभाग